लोकं फक्त Product नाही, तर.. त्यामागची गोष्ट विकत घेत असतात.

नमस्कार..! मी अक्षय, गेल्या १५ वर्षांत आम्ही अनेक ब्रँड पहिले, त्यांचा अभ्यास केला. अनेक ब्रँड सोबत कामही केले. याच अनुभवातून साकार झालंय BRAND WITH AKSHAY

आम्ही तुमच्या ब्रँडमध्ये काय Unique, Special आहे हे जाणून घेऊन लोकांसमोर ते Strongly कसे मांडता येईल याचा विचार करतो. लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करण्यावर आम्ही भर देतो.

akshay

तुम्ही काय विकताय यापेक्षा तुमचा ब्रँड काय सांगतो आणि तो लोकांच्या मनात किती खोलवर परिणाम करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. लोकांनी तुम्हाला ओळखावं, तुमच्यावर विश्वास ठेवावा, आणि पुन्हा-पुन्हा तुमच्याकडे यावं, ह्यासाठी Branding Strategy महत्वाची असते.

 BRAND WITH AKSHAY

 REAL STORIES

 REAL BRANDING

 REAL IMPACT

 BRAND WITH AKSHAY

 REAL STORIES

 REAL BRANDING

 REAL IMPACT

आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की, आम्ही तर Ecommerce Website केली, सोशल मीडियावर Regular Posting करतो, आमचे सगळे Designs पण छान असतात, मग ब्रँडिंग कशाला करायचे? किंवा हे केल्यामुळे आमचे ब्रँडिंग होतेच की, पण लक्ष्यात घ्या..

Marketing म्हणजे Branding नाही.

मार्केटिंग आपल्या Product/Services चे केले जाते आणि ब्रँडिंग हे व्यवसायाचे केले जाते. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असल्या तरी वेगवेगळ्या आहेत.

आम्ही आमच्या आजूबाजूला असे बरेच ब्रँड पाहतो की, ज्यांची सुरवात ही कोणत्यातरी Solid विचारांनी झालेली असते. लोकांची गरज ओळखून सुरु केलेल्या उद्योगामुळे लोकांच्या जीवनशैलीत काहीतरी परिवर्तन करायचे त्यांचे ध्येय असते. पण, कालांतराने ह्यातील काही ब्रँड फक्त Social Media च्या गर्दीत हरवलेले आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की, आपण मार्केटिंग करत आहोत म्हणून ब्रँडिंगकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे.

आम्ही नक्की
काय करतो..?

Brand Identity & Positioning

तुमच्या ब्रँडची एक Impactful Personality तयार करणे. तुमच्या ब्रँडला अधिक सुस्पष्टपणे, वेगळं आणि प्रभावशाली दाखवून इतरांपेक्षा तुम्ही कसे Special आणि Unique आहात, हे लोकांपर्यंत Strongly पोहोचवणे.

Communication Strategy

लोकांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक Design चा विचार करून, त्यातील भावना, मांडणी, भाषाशैली आणि Visual Media मधील Relevancy कायम ठेवणं.

Storytelling

ब्रँड स्टोरी म्हणजे तुमच्या व्यवसायामागची खरी गोष्ट. तुमच्या Brand ची अशी Story तयार करणे की, जी लोकांच्या मनाशी Connect होईल आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी Trust निर्माण करेल.

Campaign Strategy

लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडबद्दल एक सकारात्मक धारणा (Positive Perception) निर्माण करून त्यांना, तुमचा ब्रँड हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे पटवून देण्यासाठी Game Plan तयार करणे.

Marketing Strategy

तुमचे Products / Services कोणत्या लोकांपर्यंत, कोणत्या भागात, कोणत्या माध्यमातून, कशा प्रकारे आणि किती कालावधीपर्यंत पोहोचवायच्या ह्यासाठी योग्य Strategy Plan करणे.

प्राचीन काळी, एका दुर्गम गावात सदाशिव नावाचा एक साधा पण कष्टाळू तरुण राहायचा. त्या गावात पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या होती. पावसाळ्यात जमेल तेवढे पाणी जमा व्हायचे, पण उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडायच्या आणि लोकांना दूरवरच्या नद्यांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे अनेकदा गावातील लोक आजारी पडत, विशेषतः लहान मुलांना त्रास होत असे.

सदाशिवच्या मनात हे पाहून खूप दुःख होई. तो अनेक दिवस विचार करत राहिला की यावर उपाय काय? एक दिवस त्याला आठवले की त्याच्या आजोबांनी त्याला एका विशिष्ट प्रकारच्या दगडांबद्दल सांगितले होते, जे पाणी शुद्ध करतात आणि थंड ठेवतात. हे दगड गावाजवळील एका डोंगरावर सापडतात असेही त्याला आठवले.

सदाशिवने निश्चय केला. त्याने अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनी ते दगड शोधून काढले. सुरुवातीला त्याने एका मोठ्या मातीच्या रांजणात हे दगड ठेवून पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग केला. काही दिवसांतच त्याला जाणवले की पाणी केवळ शुद्धच नाही, तर ते नैसर्गिकरित्या थंड आणि गोड लागत आहे.

सदाशिवने हे दगड वापरून पाणी शुद्ध करण्याचे तंत्र शिकले. ह्याचा वापर करून गावातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचा व्यवसाय त्यानी चालू केला. हळूहळू प्रत्येक घरात शुद्ध पाणी उपलब्ध होऊ लागले. पण पुढे त्याला जाणवले की...

गोष्ट तिच्या ब्रँड ची.

तुमच्यापैकी अनेकींनी, घरातूनच आपल्या कल्पकतेला आणि मेहनतीला आकार देत, छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत, हो ना? यामागे फक्त वस्तू विकणं नाही, तर एक मोठं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय असेल. आम्हाला माहितीये की, तुमच्या प्रत्येक प्रयत्नात, तुम्ही उभ्या केलेल्या व्यवसायात एक खास गोष्ट दडलेली आहे. हीच गोष्ट प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवायला आम्ही BRAND WITH AKSHAY च्या माध्यमातून तुम्हाला मदत करू शकतो.

आम्हाला तुमचा 'ब्रँडिंग पार्टनर' म्हणून काम करायला मनापासून आवडेल. खासकरून, तुमच्यासारख्या महिला ज्यांचे घरगुती व्यवसाय आहेत, त्यांना / त्यांच्या व्यवसायाला आम्ही एक Strong आणि Reliable Identity निर्माण करून देण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. तुमच्या मेहनतीतून ओळखला जाणारा एक ब्रँड तयार करणं, ही आमच्यासाठी केवळ एक Service नाही, तर तुमची स्वप्नं पूर्ण होताना पाहण्याचं आमचं ध्येय आहे.

आम्ही, खास तुमच्यासाठी "ओळख खऱ्या ब्रँडिंग-मार्केटिंग ची" हे मोफत ऑनलाइन सेशन लवकरच आयोजित करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आगोदर Registration करणे गरजेचे आहे. चला तर मग.. भेटूया लवकरच..! तुमच्या व्यवसायाविषयी गप्पा मारायला..

गोष्ट  ब्रँड ची

काय मग, कॉफी घेता-घेता बोलूया..?

आजच तुमचे ४५ मिनिटांचे FREE Consultation Book करा.

व्हा Connect

Your Vision, Our Expertise

तुम्हाला काही प्रश्न असतील, कल्पना असतील किंवा आम्ही कशी मदत करू शकतो याबद्दल बोलायचं असेल, तर नक्की Connect व्हा. तुमचे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत!

[email protected]


© 2025 BrandWithAkshay.com by Akshay Pund

DMCA.com Protection Status